कासोदा । एरंडोल पंचायत समितीच्या वतीने आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करत आरोग्य सेवा देणार्या सेवकांचा गौरव करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पारिचारीका शोभा पाटील यांनी 24 कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट असतांना 124 कुटुंब नियोजन करण्यात यश मिळविले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका यांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, पंचायत समिती सदस्य समाधान पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा कुडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ.मुकेश चौधरी, डॉ.निशाद शेख, डॉ.दिपक साळुंखे, प्रा.सुरेश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.फिरोज शेख यांनी तर सुत्रसंचालन आशालता मराठे यांनी केले.