एरंडोल : एरंडोल तालुका महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेकडून जिल्हा परिषद शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे, यासाठी एरंडोल गट शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्वरीत या मागणीवर अंबलबजावणी व्हावी अन्यथा आंदोलन
करण्यात येईल असा इशाराही समता शिक्षक परिषदेकडून देण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा बँकाचे ए.टी.एम.तसेच त्या ऑनलाईन सुविधा व नेट बँकिंग सुविधाही नाही, या बँकेला स्वतःचा आय.एफ.एस.सी.कोड नाही. बँकेत चेकबुक मिळण्यासही विलंब होतो.शिवाय शासनाचे राष्ट्रीय कृत बँकेत पगार जमा करण्याचे स्पष्ट आदेश असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र जिल्हा बँक शाखेत पगार जमा होत असून जर सुशिक्षित शिक्षक वर्गालाच कॅशलेस व्यवहार पासून लांब ठेवले जात असेल तर कॅशलेस व्यवहाराचे काय? जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतच करावे व शिक्षकांची परवड थांबवावी अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात दिले आहे. सदर निवेदनावर तालुक्यातील असंख्य शाळा व शिक्षकांच्या स्वाक्षर्या आहेत.