झेलमसह पंजाबमेल रद्द

0

भुसावळ । हरियाणासह पंजाबमध्ये असलेल्या संचारबंदीसदृश वातावरणामुळे अप झेलमसह पंजाबमेल रद्द सह डाऊन मुंबई अमृतसर एक्सप्रेस 25 रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. साध्वींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोप असलेले डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत रामरहिम सिंह यांना पंचकुला (हरियाणा) सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत 28 ऑगस्ट रोजी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर डेरा समर्थक संतप्त झाले असून या भागातील उद्रेक पाहता 25 रोजी जम्मूवरून सुटणारी अप 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस तसेच फिरोजपूर येथून याच दिवशी सुटणारी अप 12138 फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. दरम्यान, अचानक दोन्ही एक्स्प्रेस रद्द झाल्याने आरक्षित प्रवास करणार्‍या प्रवाशांसह अन्य प्रवाशांचे शुक्रवारी चांगलेच हाल झाले.