झोटिंग समितीचा अहवाल राज्य शासनाकडे?

0

मुंबई। भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावरील जमीन खरेदीबाबत झालेल्या आरोपाची चौकशी करणार्‍या न्या. झोटिंग समितीचा अहवाल 30 जून रोजीच शासनाकडे सादर केला असल्याची माहिती आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी आरोपात खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले.

यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचा आणि सर्व व्यवहार नियमाप्रमाणेच झाले असल्याचा दावा आ. खडसे यांनी वेळोवेळी केला आहे. हा अहवाल शासनाकडे आला असल्याची माहिती मला देखील मिळाली आहे. मी निर्दोष आहे हे मला माहिती आहे. लवकरच ते सर्वांना कळेल. मंत्रिमंडळ समावेशाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आ. खडसे म्हणाले.