स्थायी समितीकडून मिळाली मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील महिलांना महापालिकेतर्फे प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक केबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट असा संच मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी दोन कोटी 90 लाख रुपये खर्च येणार असून त्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. दरम्यान, महिला बचत गटांना देखील साहित्य देण्यात येणार होते. परंतु, उपसूचनेद्वारे बचत गटातील महिलांना साहित्य देण्याचे रद्द करण्यात आले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या विभागांतर्गत महिला व बालकल्याण योजना राबविली जाते.
आधारकार्डद्वारे देणार संच
त्याअंतर्गत महिला व बालकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील झोपडट्टीतील महिलांना प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक, कंबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट संच देण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने मंजूर करुन स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. हे साहित्य देण्यासाठी महिलांचे आधार कार्ड घेऊन त्याआधारे दररोज वापरासाठी प्रत्येकी दोन चादर, दोन बॅरेक, कंबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट संच देण्यात येणार आहेत. राज्य हातमाग सहकारी महासंघाकडून सरकारच्या दर करारानुसार हे साहित्य खरेदी केले जाणार आहे.