झोपडपट्टीवासियांचा बिर्‍हाड मोर्चा

0

पुणे : लोणंद रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, गोपाळवाडी आळी व वडार आळी या गेल्या 70 वर्षांपासून रहिवासी वसाहत आहे. रेल्वे प्रशासनाकडून या झोपडपट्ट्या हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई रोखण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर गुरूवारी बिर्‍हाड मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांना दिले. यावेळी सातार्‍याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक करून पुनर्वसनाच्या सूचना दिल्याचे सांगितले.