खासदार रक्षा खडसे, आमदार सावकारे यांच्या शिष्ट मंडळाने घेतली डीआरएम यादव यांची भेट
भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीतील दोन हजारापेक्षा अधिक झोपडे तसेच दुकाने हटविण्यात येणार असल्यामुळे येथील रहिवासी, व्यावसायिक बेघर होऊन त्यांचा निवास आणि उपजिवीकेची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यापुर्वी त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने डिआरएम आर.के. यादव यांची भेट घेतली. यावेळी यादव यांनी जागा खाली करण्यासाठी झोपडपट्टीवासियांना 15 दिवसांची मुदतवाढ दिली.
बैठकीत यांची होती उपस्थिती
रेल्वेच्या याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक प्रा. सुनिल नेवे, आरपीआय आठवले गटाचे रमेश मकासरे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, देवा वाणी, विक्की बत्रा, परिक्षीत बर्हाटे, लक्ष्मण जाधव यांसह रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, वरिष्ठ अभियंता विनोद भंगाळे, दिनेश गजभिये, पी.बी. तोमर आदी उपस्थित होते.