झोपडपट्टी बचावासाठी भुसावळात अर्धनग्न मोर्चा

0

गोर-गरीबांसाठी जगन सोनवणे उतरले रस्त्यावर

भुसावळ : रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी सोमवारी दुपारी अर्धनग्न मोर्चा काढत डीआरएम प्रशासनाला निवेदन दिले. गोरगरीबांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने उठवल्यास त्यानंतर होणार्‍या परीणामास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असे सोनवणे म्हणाले. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आगवाली चाळ, सात नंबर पोलीस चौकीजवळून अर्धनग्न व झाडू महामोर्चा डीआरएम कार्यालयावर निघाला. विविध पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते.