झोपडपट्टी भागात गटारींची साफसफाई करा

0

जळगाव। अल्पसंख्यांक सेवा संघातर्फे पिंप्राळा हुडको, गेंदालाल मिल, शाहुनगर येथील गटारींची साफसफाई करण्यात यावी या मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी स्थायी सभापती वर्षा खडके यांची भेट घेत निवेदन देवून आपली समस्या मांडली. शहरातील स्लम भागातींल गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा अटकला असून त्यातून दुर्गंधी येत आहे. यातून रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

12 एप्रिल रोजी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणात्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

ठेकेदाराची नोंदणी रद्द करा
आयुक्तांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमोर संबंधित अधिकार्‍यांना ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देण्याचे आदेश देवून गटारीचे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. परंतु, ठेकेदाराने गटारीचे काम थांबविले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे या ठेकेदाराची नोंदणी त्वरीत रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदन देते वेळी प्रदेशाध्यक्ष जहाँगीर खान, जिल्हाध्यक्ष याकुब खान, महानगराध्यक्ष जुबेर खाटीक, अकबर काकर, रहिमोद्दीन काझी, असिफ शेख, अनिस खान, फिरोज खान, सलोद्दीन बिहारी, तनवीर खाटीक, विकी राजपुत, अजय सोनवणे, गौरव चौधरी, सलीम मिर्झा, फिरोज शेख, शौकत मिस्तरी, नजमीमोद्दीन काझी, सलीम खान, आरीफ मिस्तरी, अहमद एजंट, तनवीर शेख, हमीदाबी, सुरय्याबी, रजीयाबी, शरीफाबी, तस्लीमाबी, रशिदाबी, तशरूफबी आदी उपस्थित होते.