पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या कामकाजाची आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी पाहणी केली. तसेच सर्व नागरिकांनी झोपडपट्टी सर्वेक्षणासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केली. यावेळी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोले, नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, सीमा चौघुले, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, कॅनबरी एनएक्सचे ओंकार गौरीधर, उपअभियंता ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.
नियोजनाची माहिती घेतली
आमदार लक्ष्मण जगताप आणि झोपडपट्टी निर्मुलन पुनर्विकास प्राधिकरण पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोले यांनी झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या नियोजनाबाबतची माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त असणार्या अडचणीही त्यांनी समजावून घेतल्या. तसेच झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कॅनबरी एनएक्सचे ओंकार गौरीधर यांनी सविस्तर माहिती दिली.