धुळे । मध्यरात्रीच्या सुमारास बायपास रस्त्यावर ओव्हरटेक करण्यावरुन वाद घालत दोघांनी टॅकर चालकाला जीवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोघांनी रॉकेल टाकून आपल्याला जीवंत जाळल्याचा जबाब टँकर चालकाने दिला असला तरी पोलीसतपासात मात्र हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. टँकर चालकाने स्वत:च अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे. गुजरातच्या भुज तालुक्यातील रहिवासी असलेला टँकर चालक महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सिलोड येथून टँकर घेवून अहमदाबाद येथे जात होता. दरम्यान टँकर चालक स्वत:च कॅनमध्ये पेट्रोल आणि डिझेल रात्री 12.00 वाजता घ्यायला आला होता असे एका कर्मचार्याने सांगितले. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील टँकर चालक दिसून आला.त्यामुळे टँकर चालकाला जीवंत जाळले नसून त्याने स्वत:च अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा शोध पोलिस घेत आहे.