गोदावरी रुग्णालयाजवळ अपघात ; टँकर जप्त
नशिराबाद :- भरधाव टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गोदावरी रुग्णालयाजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात निहाल श्रीराम गायधनी (20, अमरावती) या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांनी धाव घेतली. पोलिसांनी दुचाकीला धडक देणारा टँकर ताब्यात घेतला.