टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0

भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर टँकरची समोरासमोर धडक बसून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भोसरीतील धावडेवस्तीजवळ बिकानेर स्वीटसमोर घडली. तुकाराम रंगनाथ झपके (वय 58, रा. गणेशनगर, बोपखेल) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम झपके धावडेवस्ती येथे पुण्याकडे जाणार्‍या बाजुने विरुध्द दिशेने येत होते. त्यावेळी पुढून आलेल्या पाण्याच्या टँकरची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात गंभीर जखमी होऊन झपके यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.संत तुकाराम महाराज संस्थानकडून वारीची जय्यत तयारी