टँकरच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू

0

हडपसर : मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर दुचाकीवरून जाणार्‍या एका महिला डॉक्टरला भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मगरपट्टा सिटीच्या साउथ गेटसमोर बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.

डॉ. अनुराधा प्रकाश पंतुलवार (25 रा. भेकराईनगर, मूळ. देगुलर, नांदेड) हिचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हडपसर येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सुमतिभाई शहा आयुर्वेद महाविद्याल्यात ‘द्रव्यगुण’ या विषयात त्या एमडी करत होती. बुधवारी सकाळी मगरपट्टा सिटी येथील मैत्रिणीला भेटून मगरपट्टाच्या दिशेने दुचाकीवरून कॉलेजला जात होती. सिटी मेन गेट चौकातून मगरपट्टाच्या दिशेने येत असताना पाठीमागून येणार्‍या टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात अनुराधाच्या डोक्याला गंभीर मार लागला. यामध्ये दुचाकी एका बाजूला व अनुराधा एका बाजूला फेकली गेली. आजूबाजूला वर्दळ नसल्याने धडक दिलेला टँकर पसार झाला. मगरपट्टा पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी घटनास्थळी पोहचून तिला मगरपट्टा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. पुढील तपास हडपसर पोलीस तपास करीत आहेत.