निफाड : नाशिक – औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर बस मधील १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात विंचूर येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडला.अपघातातील जखमींना निफाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते.अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस व अन्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. मृत्यू झालेल्या तसेच जखमी प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.