भुसावळ- पालिकेच्या बंधार्यातील पाणी आटल्याने तब्बल आठवडाभरापासून शहरवासीयांना पाण्याची भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून टँकर सुरू करण्यात आले असलेतरी मध्यरात्री हे टँकर येत असल्यो नागरीकांना रात्र जागून काढावी लागत आहे. भुसावळ पालिकेच्या विहिरीने तळ गाठल्याने चिंता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पालिकेकडून जुन्या विहिरींचा गाळ काढून तेथे पंप बसवण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.
चढ्या भावाने होतेय पाण्याची
शहरवासीयांचा टंचाईने घसा कोरडा होण्याची वेळ आली असताना दुसरीकडे खाजगी स्वरूपात टँकरला डिमांड वाढली असून त्यांचे दरही वाढल्याने नागरीकांचा ताप वाढला आहे. चार हजार लिटर क्ष्मतेचे टँकर 800 ते एक हजार रुपयांना मिळत असून विकतच्या पाण्यावर वा दातृत्ववान नगरसेवकांकडून होणार्या पाणीपुरवठ्यावर नागरीकांना विसंबून रहावे लागत आहे. मध्यरात्री येणार्या टँकरवर एकाचवेळी महिलांच्या उड्यादेखील पडत असल्याने अनेकांना पाणी मिळते तर अनेकांना मिळतच नाही, अशीदेखील स्थिती आहे. निम्मे शहरातील नागरिकांना यामुळे आता रात्र जागून काढावी लागत आहे. पालिकेने शहरातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करण्याचे नियोजन केले. यानुसार जळगावरोडवरील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळील विहिर स्वच्छ करुन पंप बसविण्यात आला. यातून आता टँकर भरण्याची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे नगरसेवक मुकेश पाटील महणाले.