टपरी, हातगाडी धारकांसाठी पंचायतीतर्फे जनजागृती अभियान

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील, टपरी पथारी हातगाडी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच एकूण फेरीवाले व हॉकर्स झोन दिलेले परवाने यांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने जनजागृती अभियान सुरू केले आहे. समितीचे अध्यक्ष पिंपरी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे फळभाजी विक्री करणार्‍या कष्टकरी महिला शारदा जगताप, सुनंदा बेडें यांचे फॉर्म भरून अभियानास प्रारंभ झाला. यावेळी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे शहर अध्यक्ष रमेश शिंदे उपाध्यक्ष गणेश अहेर, कष्टकरी पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे सरचिटणीस धर्मराज जगताप, राजेश मायरमनी, रवी शेलार, राम प्लहारे, संतोष परदेशी युवराज माळी आदी उपस्थित होते.

दहा वर्षांपासून हॉकर्स झोन नाही
टपरी पथारी हातगाडी धारकांसाठी 2007 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने देशातील पहिला कायदा केला. मात्र, 10 वर्षानंतरही शहरात एकही अधिकृत हॉकर्स झोन झालेला नाही. गोरगरिबांच्या योजनेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून श्रीमंत व्यक्तींनी लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक व्यक्िंतना लायसन्स मिळाले, मात्र त्याचे पक्क्या गाळ्यांमध्ये पुनवर्सन झाले पाहिजे. प्रत्येक विभागात हॉकर्स झोन झाले पाहिजे, यासाठी हे अभियान राबवले असल्याने बाबा कांबळे यांनी सांगितले.

15 फेब्रुवारीला अहवाल देणार
या अभियानांतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकाचा मोफत सर्वे करून 15 फेब्रुवारीला आयुक्तांना हा सर्वे सादर करणार असल्याने प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले. शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांनी अभियानात सहभागी होऊन मोफत असलेले फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन शहर अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.