टवाळखोर करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

0

जळगाव । शहरात गेल्या काही दिवसांपासून हाणामारीच्या घटना घडत असून येणार्‍या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापालिका निवडणूक होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभुमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील संवेदनशील परिसरात नाकाबंदी करून चौकशी करा, अशा स्पष्ट सुचना पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत दिल्या.

वाढत्रा गुन्हेगारीवर बसणार आळा
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वाढत्या हाणामारीच्या घटना तसेच सण-उत्सवाच्या पार्श्‍वभुमिवर मंगळवारी कराळे यांनी शहरातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली. 31 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात झालेली हाणामारी, पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांनी घातलेला हैदोस, जातीय तेढ निर्माण करून होणार्‍या हाणामार्‍यांच्या संदर्भात कराळे यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याचे सांगीतले. पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी आपल्या हद्दीतील गुन्हेगारीवृत्तीच्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. वेळोवेळी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. वारंवार धिंगाणा घालणार्‍या तरुणांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशा सुचना दिल्या. तसेच शनिपेठ, काट्या फाईल, बेंडाळे चौक, शाहुनगर, शिवाजीनगर, गेंदालाल मिल, या भागात नाकाबंदीची सूचना दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – कराळे
येणार्‍या काळात होणार्‍याा उत्सवामध्ये संयोजकांनी कार्यक्रमांच्या ठीकाणी सीसीटीव्ही लावावे. विघ्नसंतोषी लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे आहेत. उत्सवाची परवानगी घेण्यासाठी येणर्‍या संयोजनकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती करणार असल्याचे कराळे यानी सांगीतले.