मुक्ताईनगर । तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी व ज्ञानपुर्णा विद्यालय ईछापुर-निमखेडी बु॥ येथे इयत्ता आठवीत शिकणारी अंकिता राजू मुंढे हिचा राहते घरात सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला. अंकिता ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास शाळेत जायची तयारी करत असतानाच घरातच तिला सर्पदंश झाला.तिला मुक्ताईनगर जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले असता उपचारदारम्यानच तिचे निधन झाले. तिचे वडील देखील वारलेले असून आई रंजना मुंढे व आजी गीताबाई तिचा सांभाळ करत होते. तिला एक लहान भाऊ व दोन बहिणी आहेत.