चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील दुर्घटना : शिक्षण क्षेत्रात हळहळ
चाळीसगाव- शहरातील मालेगाव रस्त्यावरील राखुंडे नगरातील रहिवासी तथा टाकळी प्र.दे.येथील अश्वमेध पब्लिक स्कूलच्या शिक्षिका प्रतिभा रवींद्र पाटील (वय 32) यांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. गुरुवारी शिक्षिका पाटील या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चढत असतांना गर्दीत त्यांचा पाय घसरल्याने त्या थेट रेल्वेखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रतिभा पाटील यांच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, प्रतिभा पाटील या जळगाव येथे प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसने जात असताना ही दुर्घटना घडली. देवळाली-भुसावळ शटल गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने सकाळी जळगावकडे जाणार्या प्रवाश्यांना महाराष्ट्र एक्सप्रेसशिवाय पर्याय नसल्याने या गाडीला गर्दी वाढली आहे.