चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र दे येथील ३० वर्षीय विवाहीता २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८-३० वाजता बेपत्ता झाली असुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील टाकळी प्र दे येथील सुवर्णाबाई योगेश पाटील (३०) या २२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ८-३० वाजता राहते घरुन मेडीकल स्टोर्स मधुन आयोडेक्स घेवुन येते असे सांगुन निघुन गेल्या त्या परतल्या नाहीत म्हणुन त्यांचा नातेवाईक व सर्वत्र शोध घेतला त्या मिळुन आल्या नाहीत म्हणुन त्यांचे पती योगेश कृष्णा पाटील (३४) रा टाकळी प्र दे ता. चाळीसगाव यांनी आज दिनांक २५ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार शालीग्राम कुंभार करीत आहेत.