टाकळी प्र.दे येथे बस थांब्याची मागणी

0

चाळीसगाव । तालुक्यातील टाकळी प्र.दे.येथे बसची व्यवस्था करण्यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चाळीसगाव बस आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. टाकळी येथून शेकडो विद्यार्थी चाळीसगांव येथे शिक्षणाकरिता ये-जा करतात. परंतु सकाळी 6-15 ते 8-30 या दरम्यान एकच गाडी असल्याने गाडीमध्ये जागा नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात महाविद्यालयात उपस्थित राहता येत नाही.

विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्ष्यात घेता त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. अन्यथा याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, शुभम पवार, प्रज्वल देशमुख, कौस्तुभ राजपूत, प्रतिक मोरे, दर्शन शिंदे, हर्षल जठार, गणेश महाजन, निखिल सैतवाल, केतन अहिरे, प्रणल पवार, सर्वेश भोसले, ऋषिकेश महाजन व टाकळी येथील विध्यार्थी यांच्या सह्या आहेत.