टाकळी येथे 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

0

नगरदेवळा । येथून जवळच असलेल्या टाकळी बुद्रुक गावी 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरदेवळा येथुन जवळच असलेल्या टाकळी गावी काल 22 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पीडीत मुलगी ही घरी खेळत असतांना गावातीलच आरोपी दीपक अशोक पाटील (वय 19 वर्ष) या नराधमाने मुलीला रॅकवरील दगड काढावयाचा आहे. असे सांगून त्याच्या घरात बोलावून घेतल्यानंतर घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी आपल्याला त्रास होत असल्याचे पीडीत मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी दिपक पाटील यांच्याविरोधात गु.र.नं. 09/2018 प्रमाणे पोस्को अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पो.कॉ. जिजाबराव पवार, गणेश मराठे, विजय महाजन यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी दिपक पाटील याला अटक करण्यात आला. पुढील तपास पोनि शामकांत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन सानप, पंकज शिंदे आदी करीत आहे.