इंद्रायणी पुलाच्या सुरक्षेसाठी तरी योग्य उपाययोजना प्रशासनाने कराव्यात
पुलाची दुरूस्तीची नागरिकांची मागणी
कामशेत : आंदर मावळ परिसरातील टाकवे-कान्हे रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुल अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाचे सुरक्षारक्षक असलेले खांब तुुटले आहेत. त्यामुळे हा पुल धोकादायक बनला असून परिसरातील 40 ते 50 गावांमधील ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे. पुल तुटल्यामुुळे भविष्यात जर काही दुर्घटना घडली तर नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या पुलावरून तर नागरिकांच्या काही अपघात घडला तर त्यास कोण जबाबदार धरणार, याबद्दल परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. या पुलावरून अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहनांना जाण्या-येण्यास हाच पुल आहे. नवीन पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या आंदर मावळ नागरिकांसाठी इंद्रायणी पुलाच्या सुरक्षेसाठी तरी योग्य उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, हीच सध्यातरी एकमेव अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
सीमा निश्चित करावी
हे देखील वाचा
या पुलामुळे आंदर मावळातील सुमारे 40 गावांना जोडले जाते आहे. टाकवे-कान्हे जवळील इंद्रायणी नदी पुलावरील पुलाचे सुरक्षारक्षक खांब तुटले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षारक्षक खांबांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपूर्वी या पुलावरून टाकवे औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीची बस या सुरक्षारक्षक खांबांना धडकून मोठा अपघात झाला होता. या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, येथे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. इंद्रायणी नदीच्या या पुलावर वाहनचालकांची गैरसोय होत असल्यामुळे सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षारक्षक सीमा निश्चित करावी, याकरिता रेडियम पट्टी लावण्यात आली आहे.
आंदर मावळमधील नागरिकांना हा पूल एकमेव दळणवळणाचे साधन आहे. काही वर्षांपासून आंदर मावळ परिसराचे दिवसेंदिवस विस्तारीकरण होत आहे. या भागात औद्योगिक वसाहती बरोबरच गृहप्रकल्पासाठी या भागात अनेक व्यावसायिक उद्योजक गुंतवणूक करत आहेत.
वाहनचालकांची मोठी अडचण
हा पुल अरूंद आहे आणि परिसरातील 40 ते 50 गांवामधून नागरिक वाहने चालवित असतात. त्यामुळे कान्हे व आंदर मावळला जोडणार्या पुलाची रुंदी कमी असल्याने औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक वाहनांना मोठी अडचण होत आहे. तर मोठ्या गाड्या पुलावरून जात असताना एक साईटवरील वाहतुकीचा वेग चालकांना कमी करावा लागतो. यामुळे कित्येकदा पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे.