टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तुंचे प्रयोग

0

वरणगाव। शहरातील आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घरातील विविध टाकाऊ वस्तूंपासुन अनेक प्रकारच्या टिकाऊ वस्तु तयार करून त्यांचे प्रदर्शन विद्यालयात भरवले. केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीतील प्राचार्य व शिक्षकांकडून नेहमीच विविध प्रकारचे प्रयोग करून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच विविध विषयांमध्ये आवड निर्माण होत असते.

कलागुण प्रेमी विद्यार्थ्यांच्या पाठीवर पालकांची कौतुकाची थाप
गेल्या वर्षभरापासुन या विद्यालयात अशाच प्रकारे टाकाऊ वस्तुंपासून वापरात येणार्‍या टीकाऊ वस्तु तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले जात होते. यात पहिली ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींनी बाटल्या, वह्याची-पेपरांची रद्दी, खराब कापड, खराब शालेय साहित्य, लाकडी काड्या, पुठ्ठे, कॉम्प्युटर सीडी आदी टाकाऊ वस्तुंपासुन फोटो फ्रेम, फुलदाणी, सोफा, कार, टेबल, घरातील सौंदर्य वस्तू आदी विविध उपयोगात येणारे साहित्य तयार करून त्यांच्यात असलेले कलागुण दाखवले. या प्रयोगासाठी प्राचार्य व सीा बांथम यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी प्रदर्शनस्थळी जावुन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तुंचे कौतुक केले.