टाकीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

0

वडमुखवाडीतील हृदयद्रावक घटना

दिघी : येथील वडमुखवाडी परिसरात एका चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. शुभांश गौरव तिवारी (वय 2, रा. साईनाथ मंदीर जवळ, दिघी) असे असे या बालकाचे नाव आहे.

शुभांश सकाळी नऊ वाजता खाऊ खावून खेळत खेळत घराबाहेर पडला. मात्र, एक वाजत आला तरी तो घरी आला नाही व त्याचा खेळताना आवाज येत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी शेजारीच असलेल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याचे निदर्शनास आले. त्याला ताताडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.