टाक्यांचे भूमिपूजन

0

पुणे । पुणे महानगरपालिकेतर्फे 24 तास एकसमान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. शिवाजीनगर मतदार संघातील फर्ग्युसन कॉलेजमधील टेकडीच्या पायथ्याशी खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अत्यंत तत्परतेने टाक्या बांधण्याचे निश्चित करून त्याचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महापौर, सर्व नगरसेवक यांचे अभिनंदन करताना शिरोळे यांनी महाड दुर्घटनेतील पुलाची नव्याने केलेली उभारणी विक्रमी वेळेत पूर्ण करतानाचे उदाहरण दिले. नागरी सुविधा देताना त्या उत्कृष्ट दर्जाच्या, वेळेत पूर्ण करून द्याव्यात अशी अपेक्षा शिरोळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. यावेळी घोले रोड प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, रविंद्र साळेगावकर, संदीप काळे, सुनील पांडे, भावना शेळके, सुप्रिया खैरनार व महानगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.