टाटाच्या अहवालानंतर धनगर आरक्षणाचा प्रस्ताव

0

मुंबई : राज्य सरकार धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध असून टाटा समाज विज्ञान संस्थेने (मुंबई) यासंदर्भात आपला अभ्यास अहवाल दिल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सोपवेल, असे सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रामराव वडकुते आणि रामहरी रूपनवर यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली होती. राज्य सरकारने अद्यापही धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला नसल्याचे यावेळी मुंडे यांनी सांगितले. त्यावेळी विरोधी प७चे सदस्य आक्रमकही झाले. याच गदारोळात सरकारची बाजू मांडताना पाटील यांनी विरोधकांना फक्त राजकारण करायचे असल्याचे सांगितले.