‘टाटा एआयजी खान्देश रन‘ला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0

जळगाव । जळगाव रनर्स ग्रुपतर्फे आयोजित ‘टाटा एआयजी खान्देश रन‘ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सागर पार्क येथे पहाटे 6 वाजता खान्देश रनचे उद्घाटन करण्यात आले. शहरासह इतर ठिकाणाहून तब्बल दोन ते अडीच हजार खेळाडूसह युवा, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी सहभाग नोंदवला होता. जळगाव शहरातील रस्त्यावर धावपटू धावत आसंडून वाहतांना दिसून आले.तिन ग्रुपमधे झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पुरुष गटातून विशाल कुंवर आणि महिलामधुन प्राजक्ता गोडबोले यांनी खानदेश रन जिंकली.

रजिस्ट्रेशन केलेल्या खेळाडूंन शनिवारी खान्देश सेन्ट्रल मॉलमध्ये रनर्स किटचे वाटप करण्यात आले होते. खान्देश रन मध्ये तीन विभागात (गृपमध्ये) करण्यात आली होती. यात 10 किलो मिटरची धाव सकाळी 6 वाजता सुरूवात करण्यात आली, 5 किलोमिटरची धाव 7.15 वाजता सुरूवात करण्यात आली तर 3 किलो मिटरची धाव सकाळी 8 वाजता करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करण्या धावपटू, खान्देश कन्या क्रांती साळवीच्या उपस्थितीत या खान्देश रनला सुरूवात झाली.

यांची होती उपस्थिती
महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या उपस्थितीत फ्लॅग दाखवून रन संपल्यानंतर खेळाडूसाठी सेल्फी झोनचीही व्यवस्था केली होती. 10 की.मी.,5की.मी,व 3की.मी. फिनिशर्ससाठी स्ट्रेचिंग,मेडल्स, अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात आले.

विजेते धावपटू याप्रमाणे (तीन ग्रुपमध्ये झालेल्या या स्पर्धेत विजेते)
1) 10 किलोमीटर अंतर
* पुरूषांच्या 18-35 वयोगटातून विशाल कुंभार प्रथम, जयेश चौधरी द्वितीय, गणेश मोकाशे तृतीय. पुरूष 36-50 वयोगटातून सारंग विंचूरकर प्रथम, रविंद्र बालपांडे द्वितीय, अनिल पठावडे तृतीय. आणि पुरूष 50पासुन पुढील वयोगटातून नागोरावा भोयर प्रथम, माधव आंबेकर द्वितीय तर तृतीय संजय आंबेकर यांनी पटकावला आहे.

* महिलांमधून 18-30 वयोगटातून प्राजक्ता गोडबोले प्रथम, आश्‍विनी कटोले द्वितीय, कांचन राठोड तृतीय. महिला 31-45 वयोगटातून श्रद्धा भोयर प्रथम, कविता पाटील द्वितीय तर तृतीय अदिती महाजन. आणि 46 पासून पुढील वयोगटातून क्रांती साळवी प्रथम, सुनिता आंबेकर द्वितीय तर तृतीय विद्या बंडाळे आले आहे.

2) 5 किलोमीटर अंतर
* पुरूषाच्या 18-35 वयोगटातून प्रथम प्रथमेश व्यवहारे, द्वितीय राहुल पाटील तर तृतीय बारेला विरेंद्र. पुरूषांच्या 36-50 वयोगटातून ले.कर्नल मुरारीलाल प्रथम, द्वितीय सेप अटकले तर तृतीय दिलीप पाटील हे आले आहे.

* महिलांच्या 18-30 वयोगटातून सुमित्रा वळवी प्रथम, द्वितीय नुतन शेवळे आणि तृतीय प्रतिभत्त मुळे तर 31-45 वयोगटातून विभा कोटेचा प्रथम, द्वितीय भावना पाटील तर तृतीय रिया चोपडे प्रमाणे विजेतेपद मिळविले आहे.

3) 3 किलोमिटर अंतर
तीन किलोमिटरच्या सर्वसामान्य गटातील पुरूषांच्या सक्षम भुटाळे प्रथम, ईश्‍वर पाटील द्वितीय तर तृतीय दिक्षीत शिरसोडे यांनी मिळविले तर महिलांमधून लता ढोले प्रथम, द्वितीय आशा पाटील तर तृतीय नेहा साळुंखे यांनी पटकावला

सहभागी खेळाडूंसाठी विविध सुविधा
सहभागी खेळाडूसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह चिअर अप करण्यासाठी खेळाडू, विविध शालेय बँड पथक, पोलीस बँड, एन.सी.सी.बँड, खिरोदा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य ढोलताश्यांसह नागरीकांची मोठ्या संख्येने ठिकठिकाणी उपस्थिती होती. बिब, इलेक्ट्रॉनिक टायमिंग चिप,ड्राय फिट उत्तम प्रतीचे टी-शर्ट, गुडी बॅग,एर्नरझाल या बाबी खान्देश रन मध्ये सहभागी प्रत्येक धावपटूना देण्यात आले होते. रविवारी झालेल्या रनमध्ये आद्ययावत तंत्रज्ञानचा उपयोग करण्यात आला. ’खान्देश रन’ ही अनोखी आणि सहभागी नागरिक, खेळाडूसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिले होते. लंडन मॅरेथॉन, बर्लिन मॅरेथॉन, न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन, शिकागो मॅरेथॉन, पॅरिस मॅरेथॉन या जगभरातील लोकप्रिय ठरलेल्या मॅरेथॉनच्या धर्तीवर रविवारी जळगाव रनर्स ग्रुपतर्फे आयोजित ही रन ’न भूतो, न भविष्याती’ अशी होणार असल्याच्या विश्‍वास सहभागी धावपटूंनी व्यक्त केला.