टाटा टिगोरसह टाटा मोटर्स आणणार स्टाइलचे नवे पर्व

0

मुंबई । युवा आणि गतिमान पिढीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या ‘स्टाइलबॅक’ टाटा टिगोरचे आज टाटा मोटर्सतर्फे व्यावसायिक अनावरण करण्यात आले. जबरदस्त आकर्षक, ब्रेक-फ्री आणि क्रांतीकारी डिझाइन असलेली टाटा टिगोर ही ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारी आणि टाटा मोटर्सच्या प्रवाशी वाहनांच्या पोर्टफोलियोत भर घालणारी कार ठरणार आहे. टाटा टिगोर ही देशभरातील सर्व ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पेट्रोल व डिझेलच्या प्रकारात उपलब्ध
रेव्होट्रॉन 1.2 लिटर पेट्रोल प्रकारात 4.7 लाख रुपयांना (एक्स शोरूम दिल्ली) आणि 4.95 लाख रुपयांना (एक्स शोरूम मुंबई) तर रेव्होटोर्क 1.05 लिटर डिझेल प्रकारात ही कार 5.6 लाख रुपयांना (एक्स शोरूम किंमत, दिल्ली) आणि 5.91 लाख रुपयांना (एक्स-शोरूम किंमत, मुंबई) उपलब्ध आहे. हेक्सा कारचे दोन महिन्यांपूर्वीच अनावरण केल्यानंतर, टाटा मोटर्सने आज नावीन्यपूर्ण आणि आकर्षक अशा नव्या कारचे अनावरण केले. टियागो, हेक्सा आणि आता टिगोर या नव्या पिढीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीने देशभरातील 6000 विक्री सल्लागारांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर 650 विक्री आउटलेट्स आणि 500 सेवा केंद्रांवरही प्रशिक्षण देण्यात आले आहे. टाटा मोटर्स आर्थिक वर्ष 17-18 मध्ये आणखी 200 विक्री केंद्रे उभारणार आहे.