मुंबई। प्रोकॅम आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रवेश नोंदणीस सुरुवात झाली आहे. या गटात 15 ते 18 वर्षे गटातील मुलांना आणि टायमिंग प्रमाणपत्र नसलेल्या महिला धावपटूंना या शर्यतींमध्ये सहभागी होता येईल. या गटाच्या नोंदणीस 17 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून धावपटूंना 30 नोव्हेंबरपर्यंत नावे नोंदवता येतील. पूर्ण मॅरेथॉनच्या ऑनलाइन प्रवेशिका 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील.
या गटातील प्रवेश अर्ज 9 सप्टेंबरपर्यत एसीक्स स्टोर्स किंवा सिलेक्शन सेंटर स्पोर्ट्स स्टोअर्समध्ये 9 सप्टेंबरपर्यंत घेतले जातील. प्रवेश अर्ज स्पर्धेच्या संकेतस्थळावर भरता येईल. याशिवाय पोस्ट बॉक्स क्रमांक 11017, मरिन लाइन्स पोस्ट ऑफिस, मुंबई येथेही पत्राने प्रवेशिका पाठवता येतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 42020200 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.