टाटा मोटर्सतर्फे कामगारांना 29 हजारांचा बोनस व सानुग्रह अनुदान

0

पिंपरी-चिंचवड : टाटा मोटर्सतर्फे मंगळवारी कामगारांना 29 हजार रुपयांचा बोनस व सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन व कंपनी प्रशासनात 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता बोनस तसेच 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता सानुग्रह अनुदान रकमेसाठी करार झाला. ज्यामध्ये कंपनीने एकूण 29 हजार इतकी रक्कम करारानुसार देण्याचे मान्य केले आहे. या करारावर व्यवस्थापनातर्फे प्लांट हेड (पुणे वर्क्स) अलोक सिंग, हेड एचआर सीव्हीबीयू पुणे सरफाज मणेर व इतर व्यवस्थापन अधिकारी यांनी तर युनियनच्या वतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, सरचिटणीस उत्तम चौधरी, खजिनदार गणेश फलके, संयुक्त सचिव अबीदअली सय्यद, कार्यकारिणी सदस्य महेंद्र कदम, सुनील रसाळ, राम भगत, प्रतिनिधी विलास सपकाळ, विक्रम बालवडकर यांनी करारावर सह्या केल्या.

युनियनने गाठले उत्पादनाचे उद्दिष्ट
युनियनने उत्पादनाचे उद्दिष्ट गुणवत्तेसह गाठत उत्पादन खर्चात कपात केली आहे. त्यामुळे कंपनीने हा बोनस जाहीर केला आहे. तसेच यामध्ये कंपनीच्या सुपरअ‍ॅन्युएशन स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या कामगारांना 8 हजार 550 रुपये ही अ‍ॅड हॉक रक्कम देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यावेळी कंपनीचे कार्यकारी संचालक व सीओओ सतीश बोरवणकर यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना कंपनीची उत्पादकता व खर्चात कपात याबाबत युनियन व त्यांच्या सभासदांकडून अधिकाधिक योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.