टाटा रुग्णालयाचा संघ इंग्लंड दौर्‍यावर

0

मुंबई। यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असलेला टाटा रुग्णालयाचा क्रिकेट संघ इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. 8 ते 16 जुलै दरम्यान टाटा रुग्णालयाचा संघ लुटॉन टाऊन क्रिकेट क्लब, न्यू सीटी क्रिकेट क्लब, एनएचएस क्रिकेट संघाविरुद्ध मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. या संघाशिवाय टाटा रुग्णालयाचा संघ लंडनमधील रुग्णालयाच्या संघाविरुद्धही सामने खेळणार आहे.

टाटा रुग्णालयाचा संघ : डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. सिद्धार्थ लासकर, डॉ. देवेंद्र चाउकर, डॉ. हर्ष गुप्ता, डॉ. उमेश महंतशेट्टी, डॉ. दीपन कुलनदैवल, डॉ. जय अनम, सय्यद हुमायुन, भारत सकारीया, शैलेश सोलंकी, दशरथ बालोडरा, खिमजीभाई मकवाना, रघुनाथ शिरवळकर, सुभाष सरमळकर (मार्गदर्शक), नितीन दलाल (समन्वयक).