टायगर झाला क्रिस्टल मुंबई वॉरियर्सचा सहमालक

0

मुंबई । जगातील सर्वात मोठी फुटसाल स्पर्धा म्हणून गणल्या गेलेल्या प्रीमिअर फुटसॉल स्पर्धेतील क्रिस्टल मुंबई वॉरियर्स संघाला आता बॉलिवुडमधून पाठिंबा मिळाला आहे. बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ आता या संघाचा सहमालक झाला असून त्याचीच या संघाच्या ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे.

संघाचे सह-संस्थापक दिनेश राज म्हणाले की,आम्ही प्रीमिअर फुटसालच्या पुढील हंगामासाठी क्रिस्टल ग्रुपला मुंबई वॉरियर्सच्या सह-मालक म्हणून जाहीर करण्यास उत्सुक आहोत. टायगर श्रॉफ यांच्या सह-मालक आणि क्रिस्टल मुंबई वॉरियर्सच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर या नात्याने हे सन्मानाचे निमित्त आहे. टायगर श्रॉफ लीगसाठी भरपूर चाहते संघाला मिळाले असून यंदाच्या हंगामात आपल्या पाठीराख्यांना खूश करण्यासाठी कामगिरी संघ करेल. टायगर श्रॉफ म्हणाला की, विद्यमान विजेते असलेल्या क्रिस्टल मुंबई वॉरियर्सचे सह-मालक आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मला अभिमान वाटत आहे.