टायर फुटल्याने चारचाकी वृक्षावर आदळली

0

जळगाव- वरखेडी येथून काम आटोपून चारचाकीने घराकडे परतत असलेल्या असलेल्या जालना येथील निलेश काशिनाथ देवमाने यांची कारच्या मागचे टायर फुटून कार वृक्षावर आदळल्याची घटना 23 रोजी 6.30 वाजता घडली. दैव बलवत्तर या जोरदार अपघातात चालक निलेश देवमाने बचावले. या अपघातात त्यांना मुक्का मार लागला आहे.

जालना येथील अंबड रोड भाग्योदय नगरात निलेश काशिनाथ देशमाने कुटुंबासह राहतात. ते औरंगाबाद येथील पिपल ट्री स्किल व्हेन्चर्स प्रा.लि. येथे नोकरीला आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जावे लागत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी मित्र विवेक बाबुराव सांगोळे यांची कार विकत घेतली आहे. अद्याप ती देशमाने यांच्या नावावर होणे बाकी आहे.

अचानक कारचे मागचे टायर फुटले
जालना येथून कारने (क्र. एम.एच 20 बी.वाय 3035) 23 रोजी देशमाने हे पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे आले. काम आटोपून सायंकाळी 5.30 वाजता ते वरखेडी येथून जळगाव पाचोरा रोडने पुन्हा घराकडे परतत वडली गावाजवळ अचानक कारचे डाव्या बाजूचे मागचे टायर फुटले. यात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. यात गाडीचे पूर्ण नुकसान झाले असून सुदैवाने चालक देशमाने यांना फक्त मुक्का मार लागला असून ते बचावले. याप्रकरणी देशमाने यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून अपघाताबाबत माहिती दिली. त्यावरुन नोंद करण्यात आली आहे.