टाळुच्या कॅन्सरवर झाली यशस्वी शस्त्रक्रिया

0

जळगाव । तंबाखुजन्य पदार्थांमुळे टाळुला झालेल्या कॅन्सरवर जळगावात प्रथमच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात करण्यात आलेली शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ञांच्या टिममुळे यशस्वी ठरली. शहरातील रहीवासी असलेले अनिल पाटील यांना तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन जडले होते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्यांच्या तोंडाच्या आतील वरच्या टाळुला विकार जडला होता. अनिल पाटील यांनी औरंगाबाद येथील काही रूग्णालयामंध्ये दाखविले असता त्यांना मोठ्याप्रमाणावर खर्च सांगण्यात आला. अशावेळी अनिल पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय गाठले. याठिकाणी कॅन्सर तज्ञ डॉ.सचिन इंगळे यांची त्यांनी भेट घेतली.

या वैद्यकीर अधिकाऱ्यांचे होते परिश्रम
डॉ. इंगळे यांनी त्यांची तपासणी केली असता हार्ड पॅर्लर कॅन्सर असल्याचे निदान झाले. तीन तासाच्या अथक परीश्रमानंतर ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. जळगावात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी कॅन्सर तज्ञ डॉ.गोविंद मंत्री, भुलरोग तज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.सिध्राज परमार, डॉ.विक्रम परमार, डॉ.वृषभ पटेल, डॉ.नवदिप सिंग यांनी सहकार्य केले. रूग्णाची प्रकृती आता सुधारत असुन शालिक चौधरी, कमल शिरे, जितेश सोनार, शितल गडपोल, सुकन्या वानखेडे, ममता ठावरे, पल्लवी उईके हे रूग्णाची देखभाल करीत आहे.