टास्क फोर्स बैठकीत आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना

0

नवापुर । अति विशेष इंद्रधनुष्य मोहीम कार्यकारणी समिती टास्क फोर्सची सभा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा दालनात आरोग्य विभागामार्फत तहसिलदार प्रमोद वसावे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात डॉ.हरिषचंद्र कोकणी यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय या कार्यक्रम विषयक रुपरेषा आखण्यात आली असुन सदरील कार्यक्रमात गरोदर माता तसेच 0 ते 2 वयोगटातील सर्व बालकांचे जे लसीकरण पासुन ते आरोग्य सेवे पासुन वंचित राहिले असुन अश्या सर्व लाभार्थ्यानचे लसिकरण या माहिमे अंतर्गत करण्यात येणार आहे. या सभेत तहसिलदार प्रमोद वसावे,पं.स सभापती सविता गावीत,उपसभापती दिलीप गावीत,नगराध्यक्षा रेणुका गावीत,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,बी.डी.गोसावी, गटशिक्षण अधिकारी राहुल चौधरी डॉ अविनाश मावची,पी.एन.पिंपळसे, आर.डी.गावीत उपस्थित होते.