टिकावू व टाकाऊ वस्तूंपासून घरातच साकारली सुंदर, आकर्षक अशी सजावट !

0

हडपसर । हडपसर, आयुष्यात आपल्या आवडीची नोकरी मिळेलच असे नाही. मात्र जर तशी नाही मिळाली तरी आपली आवड जोपासण्याची कला अंगी असणे गरजेचे आहे, अशीच कला भोसले गार्डनमध्ये ग्रीन क्रेस्ट सोसायटीतील अनुशिखा सिसोदिया यांनी जोपासली आहे.

जागेचे व्यवस्थापन महत्त्वाचे
एखादी वास्तू जर फक्त सुंदर-सुंदर वस्तूंनी भरली तर ती सुंदर वस्तूंचे भांडार वाटेल पण त्यांचं वस्तूंची नियोजनपूर्वक मांडणी केली तर ती संरचना होईल. तसे त्यांच्या घरात दिसून येते. प्रत्येक ठिकाणी यांनी जागेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले आहे.

परिपूर्ण सजावटीमुळे मन स्वास्थ्य उत्तम राहते
आयटी कंपनीत काम करून घरात टिकावू व टाकाऊ वस्तूंपासून अतिशय सुंदर घराची सजावट केलेली आहे. हॉल, बेडरूम, किचन या ठिकाणी आकर्षक वस्तू तयार करून घर सजवले आहे. इंटेरिअर डिझाइनची आवड असल्याने घरात टाकाऊ वस्तूंपासून चांगल्या आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. घरात आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तू असतील तर आणखीन घरात राहताना आणखीन सुखद गारवा मनात ओलावा देत असतो. तसेच ते परिपूर्ण अशा सजावटीमुळे मन स्वास्थ्य उत्तम राहून त्यातील वावर हा सहज सुंदर होतो.

डिझायनिंग म्हणजे संरचना
घरात पाऊल टाकल्यापासून सुंदर वस्तूंचे दर्शन घडत होते. संपूर्ण घरभर स्वतः हाताने तयार केलेले वस्तू पेंटिंग्ज मांडून ठेवलेल्या होत्या. इंटेरिअर डिझायनिंग म्हणजे नेमके काय कोणी म्हणेल ‘गृहसजावट’ तर कोणी म्हणेल ‘डेकोरेशन’ पण त्याही पुढे जाऊन इंटेरिअर डिझाइन या शब्दाची व्याप्ती आहे. थोडं सोपं सांगायचं म्हटलं तर डिझायनिंग म्हणजे संरचना ज्यामध्ये फक्त सौंदर्यच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत नियोजनही तितकेच महत्त्वाचे असते असे सिसोदिया यांनी सांगितले

गेली 4 वर्षे मेहनत
पेंटिंगची आवड असल्याने बाथरूमच्या दरवाजापासून घरातील सर्व भिंतीवर विविध छोटी-मोठी पेंटिंग दिसतात. हे सर्व करता येते मात्र त्याचे व्यवस्थापन करणे अवघड असते. झाडांना पाणी घालणे. सर्व वस्तूंची साफसफाई करणे. ही सर्व कामे त्या आपली नोकरी संभाळून करतात. पतीचेही प्रोत्साहन त्यांना मिळत असल्याने त्या गेले 4 वर्षे मेहनतीने व आवडीने घराला सुशोभित करीत आहेत.