टिकीट तपासणीच्या नावाखाली थांबवताय रेल्वे गाड्या

0

पाचोरा। भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या मध्य रेल्वेची हद्द आहे. मुंबईकडे ईगतपुरी स्टेशनापर्यंत आहे. नागपूरकडे बडनेरा जंक्शनपर्यंत आहे. त्याच मध्यप्रदेशाच्या खंडव्यापर्यंत आहे. परंतू भुसावळ प्रशासनाने गेल्या दोन महिन्यापासून मध्य रेल्वेचे भुसावळ हे मोठे स्टेशन निवडले आहे. पाचोर्‍यापासून 30 किमीच्या अंतरावर असलेल्या म्हसावद येथे मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएमआर के.यादव वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा, मंडळ वाणिज्य व्यवस्थापक व्ही.पी.दहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद स्टेशन येथे देवलाली भुसावळ पॅसेंजर, महाराष्ट्र एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, गोदान एक्सप्रेस, काशी एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्यांची म्हसावद स्थानकावर थांबवून तिकीटाची तपासणी करण्यात येते. त्यामुळे जळगाव ते चाळीसगाव दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड होत आहे.

टीसी व पोलिसांच्या कामांकडे प्रश्‍नचिन्ह
सुपर फास्ट गाड्या म्हसावद सारख्या छोट्याशा स्थानकावर थांबवून प्रवाशांची तिकीट तपासणी करणे म्हणजे त्यांनी नेमूण दिलेले टीसी व एसआरपीच्या कर्मचार्‍यांना फुकटचा पगार दिला जात आहे का? असा सवाल प्रवाश्यांकडून होत आहे. जर विदाऊट तिकीट प्रवासी असला तर टीसी त्याला दंड करतो. त्याच्याकडून पावती फाडतो तर प्रत्येक सुपर फास्ट गाड्या म्हसावद सारख्या छोट्या स्टेशनवर थांबवण्याची गरज काय? भुसावळ रेल्वे प्रशासनाचा आपल्या सुपरफास्ट गाड्यांमधील टीसी, आरपीएफ यांच्यावर विश्‍वास नाही का? असे सवाल निर्माण होत आहे. पाचोरा व चाळीसगाव येथील अप-डाऊन करणारे विद्यार्थी-विद्यार्थींनी व नोकदार वर्ग, व्यवसायिक व सर्व सामान्य जनता यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एकतर पाचोरा रेल्वे प्रश्‍नासंदर्भात मध्य रेल्वे भुसावळ विभाग गांभीर्याने घेत नाही.

विविध सुविधांच्या केल्या मागण्या
पाचोराकरांनी 26 एप्रिल 2017 रोजी पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासंदर्भात जनतेचा प्रचंड मोर्चा काढला होता. त्याची दखल रेल्वे प्रशासन केव्हा घेईल? व पाचोरा जनतेला केव्हा न्याय मिळेल हा प्रश्‍न आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना चांगली दर्जेदार सेवा द्यावी. सुरक्षितता द्यावी, रेल्वे प्रवाशांसाठी मुंबईला जाण्यासाठी एक एक्सप्रेस व एक पॅसेंजर सुरु कराव्यात. एसी कोच, स्लिपर कोच, जनरल कोच यांच्या डब्यांची संख्या वाढवावी, जेणे करुन प्रवाशांची सोय होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा सुख:सोयीचा विचार करावा. अशा प्रतिक्रीया प्रवाश्यांकडून होत आहे.