टिटवापाणी पाडा शिवारातील गांजा शेती भुईसपाट : शिरपूर पोलिसांची कारवाई

चिलारे टिटवापाणी पाडा शिवारात कारवाई : दोन लाख आठ हजारांचा गांजा जप्त

Two Lakh Ganja Seized : Shirpur Taluka Police Action शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा शेतीवर कारवाई करीत दोन लाख आठ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करीत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार. 12 रोजी दुपारी चिलारे गावाजवळील टिटवापाणी पाडा शिवारात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चिलारे गावाजवळील टिटवापाणी पाडाशिवारात वन शेतात एक इसमाने स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी मानवी मेंदूवर परिणाम करणार्‍या प्रतिबंधीत गांज्या अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाव घेत छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी संशयीत हिरालाल व्यंकट पावरा (52, रा.चिलारे टिटवापाणी पाडा) याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान 74 हजार रुपये किंमतीचा 37 किलो वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे व शेतात सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेला एक लाख 34 हजार रुपये किंमतीचा 26 किलो 800 ग्रॅम वजनाचा ओला गांजा असा एकूण 2 लाख अठ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तपास एएसआय भिकाजी पाटील करीत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, एएसआय भिकाजी पाटील, संदीप पाटील, हवालदार संजय सूर्यवंशी, नाईक संदीप ठाकरे, परशुराम पवार, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, संजय भोई, योगेश मोरे, सईद रज्जाक शेख, रोहिदास पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली.