टिटवाळ्यात महावितरणचा सावळा गोंधळ सुरूच

0

कल्याण : टिटवाळ्यात महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलने केली होती .त्यानंतर महावीतरणने समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही एक ही मागणी पूर्ण न केल्याने अखेर शिवसेनेने पुन्हा येत्या 15 दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आंदोलनाची हाक दिली असून महावितरण कार्यलयासमोर ठिय्या देत महावितरण चे श्राद्ध आंदोलन करनार असल्याचा इशारा दिला आहे .

मांडा टिटवाळा परिसराच्या महावितरण चे सुमारे 40 हजारांहुन अधिक वीज ग्राहक आहेत मात्र या विभागात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू आहे . वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा,अव्वाच्या सव्वा वीज बिले,तक्रार करण्यासाठी कल्याण कार्यालयात करावी लागणारी पायपीट,एम एस इ बी च्या कामगारांना अपुरे साहित्य,अपुरे मनुष्यबळ यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले होते.

9 डिसेंबर 2016 रोजी शिवसेनेचे विजय देशेकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण च्या गलथान कारभाराबाबत आंदोलन करत महावितरण ची अंत्ययात्रा काढत आपला निषेध व्यक्त केला .यावेळी महावितरणने छोट्या मोठ्या कामासाठी टिटवाळा स्थित ग्राहकांना कल्याण बैलबाजाराच्या कार्यालयात जावे लागते त्यावर उपाययोजना म्हणून दर बुधवार व शनिवार उपअभियंता हजर राहतील, बिलिंग एजेंसीवर कडक कारवाई करू,महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात योग्य ते साहित्य देणार, मनुष्यबळ वाढणार,वीज ग्राहकांच्या तक्रारीसाठी नोंदवहि ठेवुन त्यांच्या तक्रारी टोकनद्वारे लवकरात लवकर निवारण करणार,जुने कार्यालय तुटके असल्याने लवकरच नविन कार्यालयात कामकाज सुरु करणार,फॉल्टि व नादुरुस्त मिटर लवकरात लवकर बदलुन मिळणार अशा विविध समस्यांच्या बाबत लेखी आश्वासन दिले होते .मात्र लेखी आश्वासन देऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही या आश्वासनापैकी कोणतीच मागणी अद्याप मार्गी लागली नसल्याने विजय देशेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे .तसेच सहा महिन्यापूर्वी महावितरणचा निषेध करण्यासाठी महावितरणची अंत्ययात्रा काढली होती मात्र येत्या 15 दिवसात मागण्या मार्गी न लागल्यास महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडून निषेधात्मक जनआंदोलन करणार असून मरण पावलेले महावितरण अजुन अतृप्त आहे त्यामुळे जागर गोंधळ व जेवणाचे श्राद्ध घालनार असल्याचा इशारा विजय देशेकर यांनी दिला आहे .