नवी दिल्ली । भारतामध्ये चायना उत्पादनाला वेगवेगळ्या संघटनाकडून विरोध होत आहे.असे असतांना भारतीय क्रिकेट बोर्डबरोबर चीनच्या मोबाइल निर्माती कंपनी ओप्पो मोबाइलने करार केला आहे.यापुढे भारतीय संघाचा स्पॉन्सर ही कंपनी राहणार आहे.भारतीय संघाच्या जर्सीवर स्टार ऐवजी ओप्पो राहणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत ओप्पो मोबाइलने करार केल्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रायोजक मिळाला आहे.
पाच वर्षांसाठी करण्यात आला करार
हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला असून याची सुरूवात एप्रिल 2017 पासून होईल. बीसीसीआय आणि ओप्पोमध्ये 538 कोटींपेक्षा जास्तचा करार झाल्याचे वृत्त आहे. दुसर्यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने घेतला होता. 1 जानेवारी 2014ला स्टारसोबत करार झाला होता. हा करार 31 मार्चला संपणार आहे. सहाराची स्पॉन्सरशिप डिसेंबर 2013मध्ये संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे मुख्य स्पॉन्सर बनले होते.