टिळकांचा दहशतवादाचे जनक म्हणून उल्लेख ; धर्मजागृती सभेत विषयाला वाचा फोडणार

0

सुनील घनवट ; भुसावळात हिंदू जनजागृती समितीची उद्या सभा

जळगाव- राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘दहशतवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आल्याने हिंदू जनजागृती समितीने या बाबीचा निषेध केला आहे. भुसावळ शहरात रविवार, 13 रोजी सायंकाळी सहा टीव्ही टॉवर होणार्‍या धर्मजागृती सभेत या विषयाला वाचा फोडण्यात येईल, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली.

दोषींवर कारवाईची मागणी
राजस्थान शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेख तात्काळ वगळावा तसेच हा प्रकार नजरचुकीने झालेला नसून राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्यासाठी हेतूतः लोकमान्य टिळकांचा असा उल्लेख करण्यात आला आहे. असा उल्लेख करणारे लेखक, ते छापणारे मुद्रक, प्रकाशक आणि संबंधित दोषी शासकीय अधिकार्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, संबंधित पुस्तक त्वरित मागे घ्यावे आणि संबंधितांनी या विषयी जाहीर क्षमायाचना करावी, अन्यथा या विरोधात हिंदु जनजागृती समिती देशभरात आंदोलन छेडेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी जळगाव येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परीषदेत दिला. समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत सनातन संस्थेचे सदगुरु नंदकुमार जाधव, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. श्री. गोविंद तिवारी तसेच समितीचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.