ठाणे : दिवा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी दिवा-आगासन अशा टीएमटीच्या बससेवेचा शुभारंभ खा. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. दिवा, आगासन परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाढत्या लोकसंख्या विचारात घेता या परिसरातील नागरिकांना रिक्षानेच प्रवास करावा लागत होता.
दिवा, आगासन या मार्गावर परिवहनची बससेवा सुरू करावी अशी मागणी येथील नागरिकांनी वारंवार केली होती. सदर बससेवेच्या शुभारंभप्रसंगी उपमहापौर रमाकांत मढवी, दशरथ यादव, नगरसेवक शैलेश पाटील आदी उपस्थित होते.