टीएमटीच्या मार्गात बदल

0

ठाणे । ठाणे पालिकेमार्फत वागळे इस्टेट येथील रोड नं. 28 ते एमको कंपनी या रस्त्यावर मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे परिवहन सेवेकडून काही मार्गात बदल करण्यात आला आहे. ठाणे पालिकेहून वागळे इस्टेट येथील रोड नं. 28 ते एमको कंपनी या रस्त्यावर 180 मीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याने, पुढील आदेश मिळेपर्यंत कोपरी ठाणे पूर्व ते रामनगर मार्ग क्र. 111 व वागळे आगार ते मुलुंड स्टेशन मार्ग क्र. 104 या मार्गामध्ये बदल करण्यात येत असून या मार्गावरील बसफेर्‍या वागळे आगार, साठेनगर, रोड नं.22, आय.टी.आय. सर्कल मार्गे धावतील. तरी या बदलाची प्रवाशांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.