नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मागील आठवड्यात शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मासिक पाळी दरम्यान महिला मंदिरात का जातात? असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी आणि सामान्य नागरिकांकडून टीका होत आहे. केंद्रीय पदावरील मंत्री आणि त्यातही महिला मंत्री महिलांच्याच बाबतीत असे वक्तव्य करते यावरुन त्यांच्यावर राग व्यक्त होती आहे. दरम्यान टीकाकरांना आता स्मृती इराणी प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:च इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील फोटो एडिट करुन तोंड बांधलेल्या सासूच्या जागी या फोटोमध्ये इराणी यांना दोराने बांधण्यात आले आहे. या पोस्टवर त्यांनी ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ असेही लिहिले आहे. त्यामुळे आपल्या या पोस्टद्वारे त्या टीकाकारांना प्रत्युत्तर देत आहेत.
३ तासांत त्यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टला ७५०० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांना आपल्या तुलसी या मालिकेतील भूमिकेतून आता बाहेर या असा टोला लगावला आहे. त्यामुळे आधी केलेल्या वक्तव्याची इराणी या फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून पाठराखण करत असल्याचे दिसते. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.