नागपूर : टीडीआर संदर्भातील प्रक्रिया पारदर्शी व सुटसुटीत करण्याच्या सूचना महानगरपालिकांना देण्यात येतील. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेच्या तक्रारीबाबत तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य इम्तीयाज सय्यद यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना ते बोलत होते. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.