टीम इंडियाचा विराट ‘विजयरथ’

0

हैदराबाद: विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय कसोटी संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील ‘विजयी रथ’ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही कायम राखला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकापोठापाठ एक मालिका जिंकत सुटलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचाही दणदणीत पराभव केला. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 459 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला.

अखेरच्या दिवशी बांगलादेशमसोर विजयासाठी 356 धावांचे आव्हान होते. रविंद्र जाडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले. अश्विनने 4 , जाडेजाने 4 तर, इशांत शर्माने 2 गडी बाद केले. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शाकीब अल हसनच्या रुपाने बांगलादेशला चौथा धक्का बसला. रविंद्र जाडेजाने त्याला 22 धावांवर चेतेश्वर पूजारकरवी झेलबाद केले. त्यानंतर 162 धावांवर कर्णधार मुशाफीकुर रहमानच्या रुपाने बांगलादेशला पाचवा धक्का बसला. त्याने 23 धावा केल्या. अश्विनने जाडेजाकरवी झेलबाद केले. एकबाजू लावून धरणारा महमदुल्लाह 64 धावांवर बाद झाला. त्याला इशांत शर्माने भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले. साबीर रहमानलाही 22 धावांवर इशांतने पायचीत पकडले. रविवारी चौथ्या दिवसअखेर बांगलादेशच्या 3 बाद 103 धावा झाल्या होत्या. दुसऱया डावात दिलेल्या ४५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया बांगलादेशचा डाव २५० धावांत गुंडाळला. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीवर बांगलादेशी फलंदाजांची दांडी गुल झाली. दोघांनीही प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या. तर इशांत शर्माने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.