जळगाव (स्वप्निल सोनवणे) : २०१६ मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन वर्षातही तगड्या संघांचे आव्हान असणार आहे.सरत्या वर्षात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या टीम इंडियाला या वर्षीही आपले विजयी अभियान कायम राखावे लागणार आहे.इंग्लंड, अॉस्ट्रेलिया, बांग्लादेश, आयपीएल, चँम्पियन ट्रॉफी, वेस्ट इंडीज,श्रीलंका अशी तगडी मेजवानी यावर्षी भारतीय क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. भारत व इंग्लंडदरम्यान या महिन्यात १५ जानेवारीपासून ३ वनडे व ३ टी-२० सामन्यांची मालिका मायदेशातच होणार आहे.धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.तर दुसरीकडे इंग्लंड संघही नेतृत्व बदलानंतर कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक राहील.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खरी कसोटी
इंग्लंड मालिकेनंतर फेब्रुवारीमध्ये बांग्लादेश संघ भारतात एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी येणार आहे. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये अॉस्ट्रेलिया संघ ४ कसोटींच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.यावेळी कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची खरी कसोटी असेल.एकीकडे पाकविरूद्ध अॉस्ट्रेलिया संघ शानदार कामगिरी करत असून दुसरीकडे टीम इंडियाही विजयरथावर असल्यामुळे ही मालिका क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरणार आहे.
जुन महिन्यात इंग्लंडमध्ये चँम्पियन ट्रॉफी
एप्रिल-मे मध्ये आयपीएलची रणधुमाळी रंगणार आहे.यानंतर टीम इंडिया जुन महिन्यात इंग्लंडमध्ये चँम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार आहे.यात टीम इंडियाचा साखळी फेरीत ब गटात पाक, श्रीलंका व आफ्रिकेशी सामना होईल.धोनी एन्ड कंपनील विदेशात स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी असेल.यानंतर टीम इंडिया विंडीजमध्ये ५ वनडे व एक टी-२० सामना खेळण्यासाठी जाणार आहे.अॉगस्टमध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर ३ कसोटी, ५ वनडे व एक टी-२० सामन्याच्या मालिकेसाठी रवाना होईल.यानंतर अॉक्टोबरमध्ये अॉस्ट्रेलिया संघ ५ वनडे व एक टी-२० सामन्यासाठी भारतात येणार आहे.क्रिकेट मंडळाच्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबरमध्ये पाक संघाचा भारत दौरा आहे.मात्र दोन्ही देशातील सध्याची तणावाची स्थिती पाहता या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.एकंदरीत २०१७ मध्ये टीम इंडिया आणि क्रिकेटप्रेमींसाठी ‘फूल टू क्रिकेट’ असणार आहे.