नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोठा पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडिया सध्या ट्रेकिंगचा आनंद घेत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी टीम इंडियाचे सर्व शिलेदार नुकतेच पुण्यातील ताम्हिणी घाट येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. या ट्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रवींद्र जाडेजा तसेच प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाही सहभागी झाले होते.